Wednesday, March 29, 2023

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार; हिंदू राष्ट्र मजबुतीवर देणार जोर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिवाळीत अयोध्या चा दौरा करणार आहेत. आज गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज वर जाऊन भेट घेतली तसेच अयोध्या दौऱ्याचे निमंत्रण देखील दिले. राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारत आपण अयोध्येला जाणार असल्याचे म्हंटल. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी राज यांनी त्यांचे सपत्नीक स्वागत केले. त्यानंतर राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यावेळी जगतगुरू सूर्याचार्याजी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. तसेच अयोध्येत येऊन हिंदूराष्ट्राच्या कार्यासाठी हातभार लावण्याची विनंतीही राज यांना करण्यात आली. राज यांनीही हे निमंत्रण स्वीकारले आहे. राज यांनी दिवाळीत अयोध्येला जाण्याचा निर्णयही घेतला आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरे मनानं कट्टर हिंदू आहेत. राज ठाकरे हिंदुत्वासाठी सिंहगर्जनेसारखे बोलतात. हिंदूंचा आवाज बुलंद करायचाय आहे. त्यांनी परप्रांतीय मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा कारण अनेक उत्तर भारतीय तरुणांना आगामी काळात भेट घालून देणार असल्याचे
गुरू माँ कांचन गिरी यांनी यापूर्वी सांगितले आहे.