सावरकरांना अभिवादन करणाऱ्या ‘त्या’ ट्विटने राज ठाकरे नेटकऱ्यांच्या कचाट्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज्ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. असं ट्विट राज ठाकरे यांनी बुधवारी केलं होत. मात्र त्यांच्या या ट्विटमुळे ते नेटकऱ्यांच्या चांगलेच कचाट्यात सापडले आहेत.

 दरम्यान या ट्विटनंतर सुमारे ३५० पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना ट्रोल केलं आहे. ‘छत्रपतींचा अवमान करणाऱ्याचं कसलं आलं आहे कौतुक?’ असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. ‘सावरकरांबाबत प्रबोधनकार ठाकरे यांचं काय मत होतं ते जाणून घेतलंत का साहेब?’ ‘सगळे ठाकरे सारखे नसतात’, ‘क्रांतिकारकांचे सेनापती??? कोणता तीर मारला की क्रांतिकारकांसारखं कार्य केले, माफीनामा देऊन स्वतःचा बचाव करणारे क्रांतीकारकांचे सेनापती कसे होऊ शकतात ??’ असे रिप्लाय करत अनेक नेटकऱ्यांनी राज ठाकरे यांना ट्रोल केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा देणारं ट्विट करण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काहीही ट्विट करण्यात आलं नाही. त्यावरुनही नेटकऱ्यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत.

Leave a Comment