हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. भाजपनेही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. याच पार्श्वभूमीवर आता भोंग्याच्या मुद्द्यावर राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजतंय
राज्याच्या गृहविभागामार्फत आज भोंग्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्व पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. मात्र ज्यांनी हा भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला ते राज ठाकरेच या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे आश्चर्य वाटत आहे
Maharashtra | MNS chief Raj Thackeray to not participate in the all-party meeting called by the state government to resolve the loudspeaker dispute: MNS leader Sandeep Deshpande
(File photos) pic.twitter.com/TR3FEj1gOf
— ANI (@ANI) April 25, 2022
बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार-
मनसेच्या वतीने या बैठकीला मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित राहणार असल्याचंही मनसेनं स्पष्ट केलं आहे. तर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसेच अन्य पक्षांचे नेतेमंडळी उपस्थित राहतील. मात्र या बैठकीनंतर भोंग्यावर तोडगा निघेल का हे आता पाहावं लागेल