हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दलच्या मांडलेल्या भूमिकेवरुन गैरसमज निर्माण झाला आहे. त्यांची बिहार आणि उत्तर प्रदेशबद्दलचे मते अतिशय वेगळी आहेत. राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांबद्दल प्रेम आहे, तसेच उत्तर भारतीय -मराठी लोकांमध्ये मतभेद नाहीत अस म्हणत गुरु माँ कांचन गिरी यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे. तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे,” असं मत कांचनगिरी यांनी व्यक्त केलं.
आज अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. हिंदू राष्ट्र धोक्यात आहेत. त्यामुळे हिंदूत्व विचारधारा असणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे,” असं आवाहनही कांचनगिरींनी केलं. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही. असे त्या म्हणाल्या.