पुण्यात मनसेला ‘राज’गर्जनेसाठी अखेर मैदान मिळालं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला राज ठाकरे यांच्या सभेने प्रारंभ होणार असून बुधवारी (९ ऑक्टोबर) राज ठाकरे यांची सरस्वती मंदिर मैदानात संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. या ‘राज’गर्जनेच्या माध्यमातून मनसे पुण्यातील विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. राज यांच्या सभेच्या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाकडून १ ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. टिळक रस्ता आणि शनिवार पेठेतील रमणबाग शाळेतील मैदान सभेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली.

त्यानंतर बुधवारी (९ ऑक्टोबर) सरस्वती विद्या मंदिरच्या मैदानासाठी मनसेकडून अर्ज करण्यात आला. मात्र मैदान उपलब्ध करून देणे अडचणीचे असल्याचे सांगण्यात आले.निवडणूक शाखेकडे मनसेकडून पुन्हा पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर सरस्वती मंदिरचे मैदान मनसेला उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची पुण्यातील उमेदवारांसाठीची सभा होईल. या सभेच्या निमित्ताने मनसेच्या प्रचारालाही सुरुवात होणार आहे.

मनसेने कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात उमेदवार मैदानात किशोर शिंदे यांना उतरवले आहे. कोथरूडमध्ये मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिेंबा जाहीर केला आहे. चंद्रकांत पाटलांना घेरण्यासाठी आघाडीनं व्यूहरचना केल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची वाट खडतर होणार आहे. अशातच राज यांची सभा पुण्यात होणार असल्याचे त्याचा पक्षाच्या उमेदावारांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर काही बातम्या-