गंभीर प्रश्नांमधे हात घालायचे सोडून मोदी करत बसतात योगा – राज ठाकरे

Thumbnail
Thumbnail
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई | गंभीर प्रश्नात हात घालायचे सोडून पंतप्रधान नरेंन्द्र मोदी योगा करत बसतात आणि योगा करून झाला की बॅग उचलून विदेशात पळतात अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका कामगार सेनेच्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. ‘नोटबंदीवर भाजप वाल्यांनी बोलून दाखवावे. नोट बंदीचे फायदे सांगा म्हणले तर भाजपची पाचावर धारण बसते’ असे राज ठाकरे म्हणाले. नोटबंदीमुळे तीन कोटी लोकांचे रोजगार गेले आणि ही बातमी माध्यमात येण्या अगोदर मॅनेज केली गेली असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात उत्तर भारतीय बिल्डर मनमानी करून जर सरकारी भूखंड लाटत असतील तर त्यांची गय महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार नाही. मराठी भूमीवर मराठी बिल्डर मोठा व्हावा अशी आमची भूमिका आहे. आसाम मधील घुसखोरी वर देशात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातील बांग्लादेशी घुसखोर इथं शहरभर पसरले आहेत. त्यावर उपाय काय असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.