रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आपण पाहत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही गोठवलं गेले. त्यानंतर आता आता शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी (rajan salvi) यांनी मात्र आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहाणार असल्याचं सांगत शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले राजन साळवी?
राजन साळवी (rajan salvi) म्हणाले कि माझी निष्ठा बाळासाहेब यांच्या चरणाशी आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहील आणि कुठेही जाणार नाही. उदय सामंत यांना टोला लगावताना राजन साळवी म्हणाले, की काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून अशा चर्चा केल्या जात आहेत. माझी सुरक्षा काढल्यास शिवसैनिक माझी काळजी घेतील, असा विश्वासदेखील राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी (rajan salvi) यांना उमेदवारी देण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना राजन साळवी म्हणाले मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करणार आहे. मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पक्षप्रमुख जो उमेदवार देणार त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय