हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान राजीव सातव उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली
राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. “विश्वजीत कदम यांच्यावर करोना आजाराचे उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.
राजीव सातव हे उपचारांना प्रतिसाद देत असून मला विश्वास आहे की, राजीव सातव हे करोना आजारावर मात करतील. पुन्हा जनतेच्या सेवेकरीता दाखल होतील. राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात कोणीही भेटण्यास येऊ नये, आपण जिथे कुठे असाल तिथून देवाकडे प्रार्थना करा”, असे आवाहन विश्वजीत कदम यांनी केले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.