बारामती : 2019 चा राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार बारामती येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच बारामती तालुक्यातील कांबळेश्वर च्या आशा शिवाजी खलाटे यांना देखील जिजामाता कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे बारामतीला कृषी क्षेत्रातील राज्य स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत.
बारामती येथील पवार घराणे म्हणजे एक राजकीय पार्शवभूमीच डोळ्यासमोर येते मात्र कृषी क्षेत्रात देखील पवार घराण्यातील राजेंद्र पवार यांनी झोकून देऊन काम करत बारामतीचे नाव पुढे केले आहे. बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची भर घालत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची गोडी लावली. कृषी विज्ञान केंद्र बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांच्या माध्यमातून राजेंद्र पवार देशभरातील शेतकऱ्यांची जोडले गेले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने 2019 चा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
“कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी सदैव काम करत असताना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते, तेंव्हा अधिक आनंद वाटतो. पुरस्कार जाहीर झालेले सर्व सन्माननीय भविष्यातही कृषी आणि संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करतील, असा विश्वास आहे.” अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group