हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नव्या नियमावली जारी करत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी लागणार असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी लॉकडाऊन आणि त्यामागील गणितच सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावलं जाईल. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते असेही त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, ओमायक्रॉनच्या संसर्गाच वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. परदेशानंतर आता आपल्याकडेही आता ओमायक्रॉनचे बऱ्यापैकी रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच असेल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.