मास्क मुक्तीबाबत राजेश टोपेंचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले की ..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मास्क मुक्ती होणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी मात्र हि शक्यता फेटालळी आहे मंत्रिमडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्र, अशी चर्चा झालीच नाही. मी केवळ एवढीच विनंती केली की, युरोपीय देशांमध्ये ज्याप्रमाणे करोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत त्यावरुन आपल्याला बोध घेता येईल का, याचा विचार व्हावा. असे राजेश टोपे यांनी म्हंटल

दरम्यान, राज्यात करोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण फारतर एक टक्के आहेत. बहुतेक बाधित होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे जे निर्बंध आपण लावले आहेत ते किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळालं, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, मास्क मुक्ती बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनीही हि शक्यता फेटाळून लावली. ‘मास्क लावायचा नाही अशा पद्धतीने काहीतरी बातमी सोडली गेली. मात्र हे धाधान्त खोटं आहे. मास्कमुक्त करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही. कृपा करून तशा प्रकारच्या बातम्या दाखवून लोकांच्या मनात गैरसमज पसरू नये, असे अजित पवार यांनी म्हंटल