रजनीकांत यांनी लॉन्च केले सोशल मीडिया अ‍ॅप Hoote, तुम्ही काय करू शकाल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मुलीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही या व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सह-संस्थापक आहे आणि त्यांच्यासोबत Amtex चे सीईओ सनी पोकाला आहेत. हे लॉन्च केल्यानंतर रजनीकांत यांनी ट्विट केले ‘Hoote – Voice based social media platform, from India for the world.’ याचा अर्थ असा की, Hoote हे भारतातून जगासाठी एक आवाजावर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

या प्लॅटफॉर्मवर, तुम्ही 60 सेकंदांचे लाईव्ह व्हॉइस रेकॉर्डिंग अपलोड करू शकता किंवा प्री-रेकॉर्डिंग अपलोड करू शकता. सोमवारी दिल्लीत दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत म्हणाले की,” हे अ‍ॅप लॉन्च करताना मलाही खूप आनंद होत आहे.”

रजनीकांत म्हणाले की,” आता लोकं त्यांच्या आवाजातून त्यांचे विचार आणि इच्छा व्यक्त करू शकतील. जसे ते त्यांच्या आवडीच्या भाषेत लिहितात.” या सुपरस्टारची मुलगी असलेल्या सौंदर्याने एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की,”सोशल मीडियाचे भविष्य हा आवाज आहे आणि माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे.” सौंदर्या म्हणाली की,”Hoote वर लोकं कोणत्याही भाषेत कधीही कुठूनही आपले विचार आणि भावना व्यक्त करू शकतात.”

‘या’ अ‍ॅपमध्ये काय खास आहे ?
Hoote आठ भाषांना सपोर्ट करतो आहे, ज्यात भारतीय आणि परदेशी दोन्ही भाषांचा समावेश आहे. तामिळ, हिंदी, तेलगू, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजराती या भारतीय भाषा म्हणून Hoote मध्ये डेडिकेटेड आहेत. Hoote अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की युझर्स काहीही टाइप न करता बोलून मेसेज पाठवू शकतील. याचा अर्थ Hoote हे व्हॉईस नोट अ‍ॅप आहे. एकदा व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्यानंतर, युझर्स त्यांच्या आवडीनुसार म्युझिक आणि फोटोज जोडू शकतील.

Hoote अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून फ्रीमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते. हे अ‍ॅप वापरण्यापूर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये, युझर्स रजनीकांत, गौतम गंभीर, न्यूज चॅनेल, राजकारणी यांसारख्या सेलिब्रिटींना फॉलो करू शकतील. या अ‍ॅपमध्ये असलेली व्हॉईस नोट प्ले केले जाऊ शकतात आणि सहजपणे थांबविली जाऊ शकतात. यामध्ये लाईक, री-पोस्ट आणि री-शेअर असे पर्याय उपलब्ध असतील.

Hoote अ‍ॅपचे युझर्स जास्तीत जास्त 60 सेकंदांची व्हॉइस नोट रेकॉर्ड करू शकतील. रेकॉर्डिंगनंतर कॅप्शन, बॅकग्राऊंड म्युझिक आणि इमेज एड केले जाऊ शकतात. म्युझिकसाठी इमोशन, इनवायरमेंटल, नेचर, रिलीजनल आणि नेटिव असे पर्याय उपलब्ध असतील. Hoote अ‍ॅपमध्ये कमेंट्स बंद करण्याचा पर्याय देखील आहे. कॅप्शन साठी जास्तीत जास्त 120 शब्दांचा पर्याय उपलब्ध असेल.