नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीडीपी वृद्धीचा आलेख आता उतरू लागला आहे. कठोर लॉकडाउनमुळे आता केवळ नुकसान होणार आहे, अशा शब्दांत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बजाज यांच्याशी कोरोना संकटावर ऑनलाइन चर्चा केली. त्यावेळी बजाज यांनी आपली मते मांडली.
कोरोना रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या दीर्घकालीन कठोर लॉकडाउनने अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारला बरच काही करता आले असते मात्र ते जमले नाही, अशी खंतही राजीव बजाज यांनी यावेळी बोलून दाखवली. देशात लागू केलेला लॉकडाउन हा कठोरातील कठोर लॉकडाउन म्हटलं पाहिजे. अशा प्रकराची दीर्घकालीन टाळेबंदी मी अद्याप कुठल्या देशात पहिली नाही, असे बजाज यांनी गांधी यांना सांगितले. मात्र सामाजिक आणि भावनिकतेचा विचार करता टाळेबंदी इतर देशांच्या तुलनेत ठीक होती, असे त्यांनी सांगितले.
उद्योगांना सावरण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मदत देण्यापेक्षा थेट मदत देणे आवश्यक होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एकीकडे बेरोजगारीचे आव्हान उभे ठाकले असताना उद्योगांना आता या संकटातून पूर्वपदावर येण्याचा आशावाद वाटत आहे. मात्र मागणी आणि वस्तूंचा खप वाढणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ पत पुरवठ्यातूनच उद्योगांना दिलासा मिळाला आहे, असेही बजाज यांनी सांगितले.
Watch: In conversation with Mr Rajiv Bajaj on the Covid19 crisis. https://t.co/wLwUpAwxDd
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”