हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक सुरु असून त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या खासदारांशी चर्चा करत आहेत. यावेळी आयोजित केलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राजनाथ सिंह यांच्यासोबत फोन कॉल वर घडलेला किस्सा सांगितला. रामनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलामु अलैकुम म्हणत राजनाथ सिंहांनी डिवचले मात्र यांनतर जय श्रीरामचा नारा देत उद्धव ठाकरेंनी त्याना आपला ठाकरी बाणा दाखवला.
उद्धव ठाकरे खासदाराना म्हणाले, राजनाथ सिंह यांनी आपल्याला राष्ट्रपती निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यासाठी फोन केला होता. मात्र त्यांनी फोनची सुरुवात ‘अस्सलामु अलैकुम’ म्हणतं केली. त्यांची ही भाषा ऐकून मला धक्काच बसला. यानंतर आपण राजनाथ सिंहावर चांगलेच भडकले होतो. तसेच त्यांच्या अस्सलामु अलैकुम ला मी जय श्रीराम’च्या घोषणेने उत्तर दिले आणि आपण अजूनही हिंदुत्व सोडले नाही, असा संदेश आपण दिला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू याना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मत मांडलं आहे. मात्र याबाबात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील. तसेच मुर्मू यांना पाठिंबा देणं, म्हणजे भाजपाला पाठिंबा दिला, असं होत नाही, याआधीही आम्ही मराठी व्यक्तीच्या मुद्द्यावर प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर प्रणव मुखर्जी यांनाही आम्ही एनडीएत असताना पाठिंबा दिला होता,अस संजय राऊत यांनी म्हंटल .