मुंबई l कोरोनामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना मोठ्या समस्यांना सामोरं जाव लागत आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटी, व्यावसायिक गरजूंच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यात रजनीकांत ही मागे नाहीत. रजनीकांत यांनी गरजू कलाकारांना मदत केली आहे. त्यामुळे या कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रजनीकांत यांनी ‘फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडिया’ला ५० लाख रुपयांची मदत केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी आता १ हजार गरजू कलाकारांना किराणा सामान पुरविण्याचं निर्णय घेतला आहे.
लॉकडाउनमुळे सध्या कलाविश्वातील पूर्ण कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक ज्युनिअर आर्टिस्ट, रोजंदारीवर काम करणारे मजूर यांना आर्थिक तसंच दैनंदिन समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी साऊथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन अंतर्गंत येणाऱ्या १ हजार कलाकारांना किराणा सामान पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.