राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री व्हावं- रविकांत तुपकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारणी बैठक आज सोलापूरमध्ये पार पडली त्यात,अनेक कार्यकर्त्यांकडून राजू शेट्टींनी महाराष्ट्राचे कृषीमंत्री व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून कोणत्याही प्रमुख नेत्याने तसा प्रस्ताव दिला नाही अशी माहिती स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात महाविकासआघाडीचे स्थापन झाल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढविल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनकडून वारंवार राजू शेट्टी यांचे नाव राज्याचे कृषिमंत्री म्हणून उचलून धरले जात आहे. नवीन सरकाराला स्वाभिमानाने पाठिंबा दिल्यानंतर त्यांना सत्तेत वाटा मिळेल का याबाबत चर्चा सुरु असताना रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना कृषीमंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडीने सन्मानाने वागणूक दिली तर सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होण्यास सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आज स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला असल्याचेही रविकांत तुपकर यांनी सांगितलं.

Leave a Comment