मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. राज्यापालांकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवण्यात आले होते. आज त्यासाठी विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात येणार होते. मात्र त्यागोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावरून आता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यानो स्वाभिमानी आणि शेकापच्या झोपडीच्या आड्याचा तुम्ही एक एक बांबू उपसला पण ईडीच्या वादळात तुमचा आख्खा वाडा उध्दवस्त झाला ! देवाच्या काठीला आवाज नसतो ‘!! असे ट्विट करत राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली.
https://twitter.com/rajushetti/status/1542290681452204032
उद्धव ठाकरेंचा राजीनामा
एकनाथ शिंदे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत आहोत हे जाहीर करताच मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करायला सांगावे अशा मागणीचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात देखील धाव घेतली. मात्र सुप्रीम कोर्टाने देखील बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय कायम ठेवल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी रात्री जनतेशी भावनिक संवाद साधला, व आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि काही वेळात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आपला राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यावर शिवसैनिकांना शांततेचे आवाहन
काल रात्री राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. आपण अडीच वर्षांमध्ये काय केले याचा लेखाजोखा त्यांनी यावेळी मांडला. तसेच त्यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील यावेळी केले. तर दुसरीकडे आज दहा वाजता एकनाथ शिंदे यांच्या गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. आज सकाळी 11 वाजता सर्व आमदारांना फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा केंद्राचा डाव; सामनातून गंभीर आरोप
कुर्लामध्ये 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश
गोव्याहून राजस्थानला दारू वाहतूक : महामार्गावर सापडल्या 36 हजार बाटल्या
T20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड
आर्थिक व्यवहारांशी संबंधित ‘या’ नियमांमध्ये 1जुलैपासून होणार बदल !!!