Tuesday, March 21, 2023

आपल्या नवीन एअरलाइन्स कंपनीसाठी राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 70 विमाने

- Advertisement -

नवी दिल्ली । भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला लवकरच आपल्या नव्या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट नुसार झुनझुनवाला पुढील चार वर्षांत 70 विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करू इच्छित आहे. वास्तविक, शेअर बाजाराचे दिग्गज झुंझुनवाला यांना वाटते कि,”भारतात जास्तीत जास्त लोकांनी हवाई मार्गाने प्रवास करावा.”

एव्हिएशन मिनिस्ट्री कडून लवकरच NOC मिळू शकेल
ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत झुंझुनवाला म्हणाले की,”या नवीन एअरलाइन्स कंपनीत सुमारे 3.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार आहे. या गुंतवणूकीच्या माध्यमातून विमान कंपनीत 40 टक्के हिस्सा घेण्याची योजना आहे.” ते म्हणाले की,”येत्या 15 किंवा 20 दिवसांत इंडियन एव्हिएशन मिनिस्ट्री कडून NOC मिळू शकेल.”

- Advertisement -

हवाई प्रवास आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरेल
झुंझुनवाला भारतात कमी किमतीची बजट विमानसेवा सुरू करण्याची योजना आखत आहे ज्याचे नाव अकासा एअर (Akasa Air) आणि द टीम असे असेल. या नवीन विमान कंपनीत डेल्टा एअरलाईन्सच्या माजी सिनिअर एक्सिक्युटीव्ह प्रमाणेच संपूर्ण टीमही असणार आहे. ही टीम अशा फ्लाइटकडे पहात आहे ज्यात एकावेळी 180 लोकं प्रवास करू शकतील.

झुंझुनवालाची मोठी गुंतवणूक
भारतातील वॉरेन बफे म्हणून प्रसिद्ध असलेले झुंझुनवाला यांची ही मोठी गुंतवणूक असल्याचे सांगितले जात आहे. कारण येथील वाढत्या स्पर्धेमुळे भारतातील अनेक विमान कंपन्या बंद पडल्या आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा हवाई बाजारपेठ मानला जातो, ज्यामुळे झुनझुनवाला विमानचालन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या या संधींचा फायदा घेऊ इच्छित आहेत.