शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

Rakesh Jhunjhunwala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी आज निधन झाले. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. भारतातील अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते.

गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक राकेश झुनझुनवाला हे होते. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख होती. बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे होती.

 

झुनझुनवाला हे एक व्यापारीबरोबर सीएही होते. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश होता.