हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये लोकांना संभोधित करताना राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारात राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान पाहून देश दु:खी झाला, असं म्हटलं. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेते राकेश टिकैत यांनी पलटवार केला आहे.
“देशाचा राष्ट्रध्वज हा फक्त पंतप्रधानांचा आहे का? संपूर्ण देशाचं राष्ट्रध्वजावर प्रेम आहे. ज्यानं देशाच्या ध्वजाचा अपमान केला आहे. त्याला अटक करा”, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. नव्या कृषी कायद्यांसंदर्भात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात होणार का? याबाबत विचारलं असता टिकैत यांनी बंदुकीच्या धाकाखाली चर्चा होणं शक्य नाही असं म्हटलं आहे.
२६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी भव्य ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. रॅलीला हिंसक वळण मिळाल्यामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनी मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलक शेतकऱ्यांना थेट लाल किल्ल्यावर जाऊन धुडगूस घातला होता. यात आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब झेंडा फडकवला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’