‘धिक्कार आहे अशा मंत्र्यांचा, देश नाही चालवू शकत तर राजीनामा द्या’; राखी सावंतने काढली मंत्र्यांची खरडपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाची दुसरी लाट आधीहून अधिक भयावह रूप घेऊन आली आहे. डिसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेक लोक आपला जीव गमावत आहेत. अश्या परिस्थतीत लोक अत्यंत हतबल झाले आहेत. साहजिकच देशातील अशी परिस्थिती पाहून सरकारबद्दल लोक अत्यंत असंतोष व्यक्त करीत आहेत. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक सरकारवर सडेतोड टीका करत आहेत. नुकतीच राखी सावंतने देखील या भयावह परिस्थितीकडे पाहता सरकार व मंत्रिमंडळावर ताशेरे ओढले आहेत.

https://www.instagram.com/tv/COsqyoQnN-q/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओत राखी म्हणतेय कि, ‘देशाच्या जनतेकडे लक्ष न देणा-या राजकारण्यांचा धिक्कार असो. ज्या लोकांनी तुम्हाला इतक्या विश्वासाने निवडून दिले, त्याच लोकांकडे तुम्ही अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. स्वत: अमेरिकेत जाऊन तुम्ही चांगल्या प्रतीची व्हॅक्सिन घेतली आणि लोकांना वा-यावर सोडले. देश चालवणे म्हणे काय? फक्त बाता मारणे? तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही कुठूनही ऑक्सिजन आणू शकता. आणि जर तुम्हाला देश चालविणे जमत नसेल तर राजीनामा द्या ना. मी तर म्हणेन, सोनू सूदला देशाचा पंतप्रधान केले पाहिजे. सलमान खानला बघा, तो सुद्धा किती मदत करतोय. त्याला पंतप्रधान बनवा. मंत्री तर सध्या केवळ डिबेट करत आहेत. आम्हाला तुमचे डिबेट नको. आम्हाला तुमची भाषणबाजी नको. आम्हाला व्हॅक्सिन हवी, आम्हाला बेड्स हवेत, आम्हाला ऑक्सिजन हवा’.

https://www.instagram.com/p/COsOpgVDE8_/?utm_source=ig_web_copy_link

पुढे मंत्रिमंडळातील नाकर्त्या राजकारण्यांवर बससत ती अचानक रडायला लागली. देशाची स्थिती भीषण आहे. लोकांचे जीव जात आहेत. मी रात्ररात्रभर झोपू शकत नाहीये. मी स्वत: देशाची स्थिती बघतेय. माझ्या देशातील लोक किड्या मुंग्यासारखे मरत आहेत. ही तर दुसरी लाट आहे. आता तिसरी लाट येणार आहे. ती लहान मुलांवर येणार आहे. त्या आईबापांची काय स्थिती होणार? असे बोलताना राखी भावुक झाली आणि राखीला अश्रू अनावर झाले.

Leave a Comment