मुंबई । बुधवारी (१९ ऑगस्ट) संध्याकाळी माटुंगा येथे राहणारे 41 वर्षीय प्रसिद्ध चित्रकार राम कामत यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बाथ टबमध्ये सापडला असून त्यांनी सुसाईड नोट लिहून आपल्या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून राम कामत हे डिप्रेशनमध्ये होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र ते डिप्रेशनमध्ये का होते याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांनी एडीआर दाखल करून याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
राम कामत हे मुंबईतील माटुंगा येथे ते आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. राम कामत बुधवारी संध्याकाळी आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर बराच वेळ झाला तरी ते बाथरूममधून बाहेर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या आईने दरवाजा ठोठावला. मात्र दरवाजा आतून बंद केला नव्हता. दार उघडून त्यांची आई जेव्हा आत गेली, तेव्हा राम कामत बेशुद्धा अवस्थेत बाथ टबमध्ये पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
राम कामत यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे अजून बाकी आहे, तसेच त्यांचा व्हिसेरा टेस्टिंगसाठी पाठवण्यात आला आहे. ज्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. राम यांचा मृत्यू बाथरूम टबमध्ये बुडून झाला की, त्यांनी कुठचा विषारी द्रव्यपदार्थ घेतला होता? हे त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र पोलीस सुसाईड नोट मिळाल्यामुळे आत्महत्या समजून तपास करत आहेत. या सुसाईड नोटमध्ये राम कामत यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यांनी जे चित्रं काढली आहेत ती त्यांच्या मित्रांना देण्यात यावीत, त्यांची आठवण म्हणून’
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. राम कामत यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. तर विसरा रिपोर्टला काही वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे रिपोर्ट आल्यानंतरच राम कामत यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”