हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले या गावात गेल्यावर्षी 16 एप्रिल रोजी दोन हिंदू साधुंची आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थांनी चोर समजून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी गावातील 115 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच बाबतीत मुंबई पोलिसांनी राम कदम यांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई केली आहे. यासंदर्भात राम कदम यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे. साधुंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते.
काय आहे प्रकरण?
16 एप्रिल 2020 रोजी, 70 वर्षीय चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी आणि 35 वर्षीय सुशीलगिरी महाराज आपल्या 30 वर्षीय वाहन चालक निलेश तेलगडे सुरत याठिकाणी जात होते. देशात लॉकडाऊन असल्यानं जागोजागी विविध निर्बंध होते. अशात गुरू श्री महंत रामगिरी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित साधु पालघर मार्गे जात होते. यावेळी रात्री दहाच्या सुमारास गडचिंचोले गावातून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि चोर समजून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणी दोन साधुंसह चालकाचा दुर्दैवी अंत झाला होता.
या घटनेनंतर देशाभरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या दुर्दैवी घटनेला आज 1वर्ष पूर्ण झाले आहे.याच पार्श्वभूमीवर राम कदम पालघर जिल्ह्याचा दौरा करणार होते.कोरोनाची परिस्थिती पाहता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राम कदम यांना बाहेर पडण्यास मनाई केली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page