व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नोटांवर मोदी- सावरकरांचा फोटो; कोणी केली मागणी??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर लक्ष्मी मातेचा आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यांनतर भाजप आमदार राम कदम यांनीही ट्विट करत पंतप्रधान मोदी, वीर सावरकर यांचे नोटांवरील फोटो शेअर केलं आहेत.

राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा नोटांवरील फोटो शेअर केला आहे. त्याखाली अखंड भारत, नया भारत, जय श्रीराम जय माता दी अस कॅप्शन दिले आहे.

तत्पूर्वी, राम कदम यांच्या आधी भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेलं ट्विट शेअर केले होते. हेच योग्य अस त्यांनी म्हंटल होत. त्यामुळे केजरीवाल यांच्या विधानाचे महाराष्ट्रात मोठं पडसाद पाहायला मिळत आहे.