नवी दिल्ली, प्रतिनिधी । संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेत करावा अशी माझी मागणी आहे. संसदेत सदस्यांना आपला विरोध आणि मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे.संयमाने मत प्रदर्शन करावे. मात्र माईक तोडणे ; बिल फाडणे; धक्काबुक्की करणे अशी गुंडागर्दी करणे चूक आहे. रामदास आठवले यांनी ह्या सदस्यांना पुढील अधिवेशनापर्यंत निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
सध्या चर्चेत असलेल्या कृषी विधेयकांला विरोध करतांना विरोधकांनी उपसभापती यांच्या समोर गोंधळ घातला होता. काही विरोधी सदस्य यांनी उपसभापती हरिवंशसिंह यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला होता तर काही सदस्यांनी उपसभापतींना रूलबुकही दाखविले.
राज्यसभेत काल गोंधळ घातल्या प्रकरणी विरोधी पक्षाच्या ८ खासदारांना आज राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी निलंबित केले आहे. आज डेरेक ओ ब्रायन, संजय सिंह, राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेना, सय्यद नाजीर हुसैन, इलामारन करीम अशी निलंबित केलेल्या खासदारांची नावे आहेत.
निलंबित केलेल्या खासदार यांच्यावर एक आठवड्यासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेत करावा अशी माझी मागणी आहे. संसदेत सदस्यांना आपला विरोध आणि मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे.संयमाने मत प्रदर्शन करावे.मात्र माईक तोडणे ; बिल फाडणे; धक्काबुक्की करणे अशी गुंडागर्दी करणे चूक आहे. pic.twitter.com/zXulwfUgdU
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2020
राज्यसभेत पहिल्यांदाच अशी काल गुंडागर्दी झाली. धक्काबुक्की करणे;योग्य नाही. राज्यसभेचे नाव खराब करण्याचे काम या गोंधळ घालनाऱ्या खासदारांनी केले.त्यांना केवळ या अधिवेशनापुरते निलंबित केले मात्र माझी मागणी आहे की त्यांना पुढील अधिवेशनासाठीही निलंबित करा
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 21, 2020