हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे , ती काळाची गरज आहे, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असे म्हणत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.