हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू असून शिवसेना नेते रामदास कदम यांना विधानभवनाच्या गेटवर अडवल्याने चर्चाना उधाण आले आहे. रामदास कदम यांनी आरटीपीसीआर टेस्ट न केल्याने अडवण्यात आल्याचं समजत आहे. त्यामुळे रामदास कदम नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचे आहे.
रामदास कदम यांनी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केलेली नाही त्यामुळे त्यांना आतमध्ये प्रवेश नाकारला आहे. आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट हा सर्वाना अनिवार्य असतो. त्यामुळे पोलिसांनी रामदास कदम यांना विधानभवनात येण्यास मज्जाव केला आहे असे समजत आहे. रामदास कदम याना अडवल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील तसेच शिवसेनचे आमदार त्यांना गेटवर आणण्यासाठी गेले. त्यानंतर रामदास कदम याची अटीजेंन टेस्ट करून त्यांना सोडण्यात आलय
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे चर्चेत आहेत. एका कथित ऑडीओ क्लिप पासून शिवसेना हायकमांड रामदास कदम यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त समोर आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी निवडीतही कदम समर्थकांना बाजू ठेवले गेले. त्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते.