Business Idea : अवघ्या 2 महिन्यात 1 एकर खरबूज पिकातून केली 3 लाखांची कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या काळात शेतीला चांगले महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण शेतीक्षेत्राकडे वळू लागले आहेत. विविध प्रयोग, जोडधंदा करून त्यातून चांगले उत्पन्न मिळवू लागले आहेत. शिकून नोकरी करण्यापेक्षा घरची असलेली शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या अहमदनगर येथील शेतकरी तरुण रमेश जगताप याने जिद्दीच्या जोरावर अवघ्या 2 महिन्यात 1 एकर क्षेत्रात खरबूज पिकातून 3 लाखांची कमाई केली आहे.

राज्यात आज अनेक तरुण शेतकरी शेती क्षेत्रात आहेत. आपल्या पदवीच्या शिक्षणानंतर कृषिक्षेत्रातील अनेक प्रयोगाची माहिती घेत त्यांच्याकडून स्वताच्या शेतात अनेक पिकांची लागवड केली जात आहे. त्यांच्या पैकी एक रमेश जगताप होय. नववी शिकलेल्या या तरुणाने आपल्या शेतात टरबूज लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून चांगले पैसेही मिळवले आहेत.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतात अशा प्रकारे अनेक प्रयोग करायचे असतील आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा त्यातून तुम्हाला नवनवीन व्यवसायाबद्दल माहिती मिळेल आणि त्यातून तुम्हीही स्वतःचा व्यवसाय करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला शेतीशी निगडित अनेक जोडव्यवसाय, त्यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजनाची माहिती मिळेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

खरबूज फळपिकांवर वारंवार प्रयोग

अहमदनगर येथील रमेश जगताप आपल्या दोन एकर शेतात अनेक प्रयोग करत आहे. दरवेळी नवीन प्रयोगाची माहिती कानावर पडली कि तो प्रयोग रमेश आवर्जून आपल्या शेतात करत. आतापर्यंत त्याने स्वीट कॉर्न, मका, वांगी मिरची अशा पिकावर प्रयोग केला आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. शेतीत मुख्य पिकाबरोबर इतर पिके आलटून पालटून घेतल्यामुळे त्यांना यातून चांगले उत्पन्न मिळत आहे.

खरबूज

दुःखाचा डोंगर कोसळला तरी खचला नाही

रमेशला शेती करताना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. शिकण्याच्या वयात असलेल्या रमेशच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी रमेशच्या खांद्यावर आली. अवघे नववीपर्यंतच शिकलेल्या रमेशपुढे कुटूंबाची जबाबदारी कशी पार पाडायची हा प्रश्न होता. मात्र, रमेशला त्याच्या मित्रानी साथ दिली.

farming frirnd

मित्राने केली मोलाची मदत

रमेशचे गावातील अनेक मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध. मात्र, त्यातून अक्षय या मित्रासोबत रमेश कायम आपला वेळ घालवत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला त्याचा मित्र अक्षयने धीर दिला. इतकंच नाही तर त्याला वडिलांची शेती करण्याचा सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यानुसार वडिलोपार्जित दोन एकर शेत जमीन रमेश कसू लागला. रमेशचा मित्र अक्षय हा प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना केंद्र चालवत असल्याने त्याने वेळोवेळी खतांची औषधांची माहिती रमेशला दिली. आणि दोन एकर क्षेत्रात वेगवेगळ्या पिकांची फेरपालट करून रमेशने शेती सुरू केली.

गाईचे संगोपन

शेतीसोबत केला जोडव्यवसाय

रमेशला शेतीची आवड असल्याने त्याने शेतीसोबत जोडव्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. मग त्याने मित्राच्या मदतीने गाईचे संगोपन सुरू केले. शेतीसोबतच दूध आणि शेणाच्या विक्रीतूनही त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. आज तो शेतीतून आणि पशुपालनातून आठ ते दहा लाखांची कमाई करत आहे.