आध्यात्मिक व्यासपीठाचा वापर राजकीय द्वेषासाठी केल्यामुळे रामकृष्ण मिशनचे मठाधिपती मोदींवर नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
टीम हॅलो महाराष्ट्र । राष्ट्रीय युवा दिवसानिमित बेलूर येथे झालेल्या मोदींच्या भाषणावर मठात नाराजी व्यक्त होत आहे. मोदींनी याठिकाणी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य केलं होतं. “रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादस्पद विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं बघून खूप वाईट वाटलं,” अशा शब्दात साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. स्वर्गीय स्वामी आत्मस्थानानंद यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या मिशनचे सदस्य गौतम रॉय यांनी संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. “राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या रामकृष्ण मिशनच्या व्यासपीठावरून विवादास्पद असलेल्या विषयावर राजकीय संदेश दिला जात असल्याचं पाहून खूप दु्ःख वाटलं,” असं ते म्हणाले. रामकृष्ण मिशनची दीक्षा देण्याची एक अधिकृत प्रक्रिया असून मोदींनी ती दीक्षा घेतलेली नाही. त्यासोबतच राजकीय अंगाने बोलण्याची परवानगीही त्यांना देण्यात आलेली नव्हती. हे सांगत असतानाच रामकृष्ण मिशनला काही काळापूर्वी अशाच घटनेवरून राजकीय वादातही ओढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
“मिशन ही अराजकीय संस्था असून लोकांना अडचणीत आणणाऱ्या व्यक्तीला बोलवायला नको” असं
मोदींच्या भाषणाविषयी बोलताना मठाचे सचिव स्वामी सुविरनंदा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी केलेल्या भाषणावर काही मत व्यक्त करायचं नाही. ही अराजकीय संस्था आहे. आम्ही घर सोडून इथे आत्मसंवादासाठी आलो आहोत,” असं ते म्हणाले. याशिवाय मोदी लोकांना अडचणीत आणतील म्हणून त्यांना बोलवायला नको असं मी आधीच सांगितलं होतं हा दाखलाही मठातील एका विद्यार्थ्याने दिला.

Leave a Comment