महाबळेश्वर | सांगली शहरात गेल्या आठवड्यात आलेल्या रानगव्याच्या एंन्ट्रीनंतर आता आता थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे मंगळवारी मध्यरात्री दि. 3 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घुसला होता. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली रानगव्याने फेरफटका मारला. मध्यरात्री गव्याने बाजारपेठेत आल्याने त्याचे चित्रीकरणही कैद झाले आहे.
महाबळेश्वर बाजारपेठेत गवा हा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. या गव्याचे चित्रीकरण सीसीटीव्हत कैद झाले आहे. महाबळेश्वर परिसरात घनदाट जंगल आहे. येथे अनेक प्रकारचे पशू पक्षी आहेत. जंगलाचा भाग साेडून ते कधीच शहरात येत नाहीत. परंतु मध्यरात्री एक रानगवा बाजारपेठेत घुसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
https://www.facebook.com/watch?v=222437713390021
या गव्याची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागास कळविले. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी गव्यास नजीकच्या जंगलात हुसकावून लावले. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. पहिल्यांदाच गव्याचा फेरफटका बाजारपेठेत झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.