Range Rover Sport 2023 ची डिलिव्हरी सुरु; पहा फीचर्स आणि किंमत

Range Rover Sport 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jaguar Land Rover India ने आपली प्रसिद्ध SUV रेंज रोव्हर स्पोर्ट 2023 च्या नव्या व्हेरिएन्टची डिलिव्हरी सुरु केली आहे. ज्या ग्राहकांनी या SUV चे ऍडव्हान्स बुकिंग केले आहे त्यांना कंपनी आधी डिलिव्हरी करेल. ही SUV डायनॅमिक एसई, डायनॅमिक एचएसई, ऑटोबायोग्राफी आणि फर्स्ट एडिशन स्पेसिफिकेशन्समध्ये उपलब्ध आहे.आज आपण जाणून घेऊया या कारचा फस्ट लुक, फीचर्स आणि किमतीतबाबत..

नवीन रेंज रोव्हर स्पोर्ट (Range Rover Sport 2023) आधीच्या मॉडेलपेक्षा अनेक बदलांसह सज्ज आहे. नवीन रेंज रोव्हर स्पोर्टमध्ये मोठ्या रेंज रोव्हरप्रमाणेच एमएलए फ्लेक्स आहे, नवीन स्पोर्टचा व्हीलबेस 74 मिमीने वाढला आहे आणि आउटगोइंग जनरेशनच्या तुलनेत उंची 17 मिमी जास्तआहे. या गाडीमध्ये बसण्यासाठी ऐसपैस जागा आहे. तसेच तुमचे साहित्य ठेवण्यासाठी पाठीमागे भलीमोठी जागा आहे. या SUV ला साधारण 2,997 मिमी व्हीलबेस मिळतो.

फीचर्स – Range Rover Sport 2023

2023 रेंज रोव्हर स्पोर्टमध्ये (Range Rover Sport 2023) दिलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, या लक्झरी एसयूव्हीमध्ये जवळजवळ सर्व प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत ज्यात रॅक बॅक डॅशबोर्ड, 13.1 इंच टचस्क्रीन शार्प डिजिटल डायल स्क्रीन, एचव्हीएसी कंट्रोल्स, फॅन स्पीड पुश कंट्रोल, लेदर अपग्रेड, मेरिडियन नवीन वैशिष्ट्ये आहेत. जसे की 3D साउंड सिस्टीम, सेंट्रल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड अप डिस्प्ले, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, ड्रायव्हर असिस्ट पॅक उपलब्ध आहेत.

 इंजिन-

कंपनीने पेट्रोल आणि (Range Rover Sport 2023) डिझेल दोन्ही इंजिनसह 2023 रेंज रोव्हर स्पोर्ट सादर केला आहे. पहिले इंजिन 3.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 394 Bhp पॉवर आणि 550 Nm पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे इंजिन 3.0-लिटर डिझेल इंजिन आहे जे 346 Bhp पॉवर आणि 700 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

किंमत

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास कंपनीने तिच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्ट नुसार किंमत ठेवली आहे. त्यानुसार बेस मॉडेल 2023 रेंज रोव्हर स्पोर्ट डायनॅमिक SE D350 ची किंमत 1.64 कोटी रुपयांपासून सुरू होते. रेंज रोव्हर स्पोर्ट डायनॅमिक HSE D350 ची किंमत 1.71 कोटी रुपये आहे. रेंज रोव्हर स्पोर्ट ऑटोबायोग्राफी D350 ची किंमत 1.81 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप व्हेरिएंट 2023 रेंज रोव्हर स्पोर्ट फर्स्ट एडिशनची किंमत 1.84 कोटी रुपये आहे.

हे पण वाचा : 

Volkswagen Tiguan Exclusive Edition भारतात लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

इथेनॉलवर चालणारी Maruti Suzuki ची पहिली कार लॉंच, जाणून घ्या कसे काम करेल इंजिन?

Toyota Glanza CNG कार लॉन्च ; 31 किमी मायलेज

Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक