Ranji Trophy मध्ये घडला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी बंगाल ठरली पहिली टीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बँगलोर : वृत्तसंस्था – रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) क्वार्टर फायनलमध्ये एक इतिहास घडला आहे.रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) बंगालच्या टीमने असा विक्रम केला जो आतापर्यंत कोणालाच करता आला नव्हता. टीमच्या पहिल्यापासून नवव्या क्रमांकाच्या बॅट्समननी 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन केले. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे. बंगाल आणि झारखंड यांच्यात बँगलोरमध्ये सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) क्वार्टर फायनलमध्ये हा इतिहास घडला आहे.

बंगालने 773 च्या स्कोअरवर आपला डाव घोषित केला. टीमचे 7 खेळाडू आऊट झाले, म्हणजेच क्रीजवर 9 बॅट्समन आले, या सगळ्यांनी 50 पेक्षा जास्त रन केले.बंगालकडून सुदीप कुमार घरामीने सर्वाधिक 186 रन केले तर ए. मजूमदारने 117 रन केले. तसेच बाकीच्या 7 खेळाडूंनी अर्धशतक केले आहेत.

कोणत्या खेळाडूंनी किती रन केले ?
अभिषेक रमण- 61 रन, अभिमन्यू इश्वरन- 65 रन, सुदीप कुमार घरामी- 186 रन, ए.मजूमदार- 117 रन, मनोज तिवारी- 73 रन,अभिषेक पोरेल- 68 रन, शाहबाज अहमद- 78 रन, सायन मंडल- 53 रन नाबाद,आकाश दीप- 53 रन नाबाद बंगालची टीम मोठ्या स्कोअरकडे वाटचाल करत असताना आकाश दीपने वादळी खेळी करत 300 च्या स्ट्राईक रेटने 18 बॉलमध्ये 53 रन केले. यामध्ये त्याने 8 सिक्स लगावले आहेत.

हे पण वाचा :
आता सहकारी बँकांकडून घेता येणार 1.40 कोटी रुपयांपर्यंतचे होम लोन, RBI ने वाढवली मर्यादा

चालत्या ट्रेनमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज !!!

IND vs SA T-20 : टीम इंडियाला दुसरा धक्का, केएल राहुल नंतर ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

खुशखबर !!! Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही करता येणार पेमेंट

Leave a Comment