धक्कादायक!! जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा केला पीडितेवर बलात्कार

0
62
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी। अल्पवयीन मुलीवर पूर्वी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या नराधमाने जामिनावर सुटून आल्यावर केस का केली? असे म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घडली. सागर सुनील श्रीसुंदर (रा शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. या नराधमावर याआधी सदर पीडित अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून बलात्कार केल्याचा छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

छावणीतील शांतीपुरा भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी परिसरातील शाळेत दहावीत शिकते. ती दररोज सायंकाळी परिसरातील एका प्रार्थना स्थळी जात असते नेहमी प्रमाणे ती ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रार्थना करून घराकडे पायी येत होती. तेव्हा सागरने तिला रस्त्यात अडविले व मारहाण करून सोबत आणलेल्या रिक्षात बळजबरी बसविले तू माझ्यावर केस केली असे म्हणत त्याने रिक्षा तही तिला मारहाण केली तरुणीचे तोंड दाबून छावणीतील कब्रस्तानकडे रिक्षा नेण्यास रिक्षाचालकाला सांगितले तिथे रिक्षावाला सोडून निघून गेल्यानंतर त्याने तरुणीस मोकळ्या जागेत नेले तेथे पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व तरुणीचे दोन्ही हात बांधून बलात्कार केला.

तरुणीने गयावया करून कशीबशी रात्री १० वाजता त्याच्या तावडीतुन सुटका करून घर गाठले व घडलेला प्रकार आई व मावशीला सांगितला या घटनेनंतर तरुणीने ७ ऑक्टोबर रोजी छावणी पोलिस ठाण्यात सागर श्री सुंदर विरुद्ध तक्रार दिली याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे अधिक तपास करीत आहे.

इतर काही बातम्या-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here