पुण्याला हादरवणाऱ्या ‘त्या’ घटनेचा कोर्टाने दिला निकाल, नराधम आरोपीला दिली फाशीची शिक्षा

pune crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – मागच्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील पाणशेत परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घटना घडली होती. यामध्ये आरोपी नराधमाने अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. या आरोपीने पीडित मुलीला पैसे आणि खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घरातून पळवून नेले होते. यानंतर या नराधम आरोपीने त्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली होती. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 48 तासात नराधम आरोपीला अटक केली. यानंतर काल 28 फेब्रुवारी 2022 रोजी न्यायालयाने या प्रकरणातील नराधम आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर एक वर्षांनी या चिमुकलीला न्याय मिळाला आहे. संजय बबन काटकर असे या आरोपी नराधमाचे नाव आहे.

त्यादिवशी नेमकं काय घडलं?
15 फेब्रुवारी 2021 रोजी अडीच वर्षीय पीडित मुलीचे आई वडील पुण्यानजीक असणाऱ्या पाणशेत याठिकाणी रोजंदारीवर काम करत होते. दरम्यान या दाम्पत्याची अडीच वर्षांची मुलगी घराच्या आसपास खेळत होती. यादरम्यान आरोपी नराधम संजय काटकर याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला पैसे आणि बिस्किट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर तिचे अपहरण केले. यानंतर हा आरोपी नराधम पीडितेला मालखेड ते थोपटेंवाडी परिसरात निर्जनस्थळी घेऊन गेला.

त्यानंतर आरोपी नराधमाने क्रूरतेचा कळस गाठत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीची निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्या ठिकाणीच एका मोरीत चिमुकलीचा मृतदेह टाकून नराधमाने घटनास्थळावरून पळ काढला होता. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर वेल्हा पोलिसांनी आरोपी नराधमाला अवघ्या 48 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. यानंतर न्यायालयाने आरोपी नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.