सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे
पलूस तालुक्यातील एका तरूणीशी सोशल मिडियावरून ओळख करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक येथील विशाल चव्हाण या संशयिताला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे उभे केले असताना न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये विशाल चव्हाण याने सोशल मिडियाव्दारे पलूस तालुक्यातील एका पिडित तरूणीशी ओळख केली. त्यानंतर दोघांमध्ये सतत सोशलमिडियाच्या माध्यमातून संभाषण झाले. ते एकमेकांच्या संपर्कात येत गेले. त्यांच्यात प्रेमसंबंधही निर्माण झाले. त्यानंतर विशाल हा सांगलीत तिला भेटण्यासाठी आला. पिडीत तरुणीला शहरातील एका लॉजवर नेऊन त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान पिडीत तरुणी गर्भवती झाली. तिने विशाल याला लग्न करण्याचा आग्रह धरला. पण त्याने नकार दिला. मार्च महिन्यात तो पुन्हा सांगलीत आला. त्याने बळजबरीने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून तिचा गर्भपात केला. यामुळे पिडीत तरूणीने सांगली शहर पोलीस टाण्यात विशाल चव्हाण याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विशाल याला दुपारी सांगलीतून अटक केली.