सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई तालुक्यातील धोम धरणाच्या लगत असलेल्या निर्जनस्थळी वाई तालुक्यातील एका गावातील 17 वर्षाच्या अल्पनयीन युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी आकाश प्रवीण पोळ (वय- 22, रा. धोम) याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु घटनेनंतर आरोपी दोन दिवसापासून फरार झालेला होता, त्यास वाई पोलिासांनी अटक केलेली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावातील पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आकाश पोळ याचा वाढदिवस असल्याने त्याने त्या युवतीला आपण फिरायला नेले होते. गणपती घाटावरुन दुचाकीवर बसवून धोम धरणाच्या जवळ असलेल्या निर्जनस्थळी युवतीला घेवून गेला. तेथे दुचाकीवरुन खाली उतरवत झाडीत ओढत घेवून गेला. तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुला काही होणार असे म्हणून तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. सदरचा प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या घरच्यांना जीवंत सोडणार नाही, असा इशारा दिला होता.
संशयित आरोपीचे आकाश पोळ हा दोन दिवसापासून फरार होता. आकाश पोळ हा कुडाळ (ता. जावळी) येथील एका वेल्डिंगच्या दुकानांमध्ये लपून बसला होता. या संदर्भामध्ये वाई पोलीस ठाण्याचे तपासणी अधिकारी सपोनी रवींद्र तेलतुंबडे यांना माहिती मिळताच त्यांनी 24 तासांच्या आत नराधम आकाश पोळ याला ताब्यात घेतले. आज सकाळी सातच्या सुमारास जेरबंद केले. आरोपीवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे हे करत असून अखेर वाई पोलिसांना नराधमास पकडण्यास यश आले.