धक्कादायक ! शाळेत नेऊन 25 वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणीसोबत खेळणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस आल्यावर नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचारासहित अन्य कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अंकुश दिगंबर भोस्कर असून तो कोंढासावळी या ठिकाणचा रहिवाशी आहे. शनिवारी दुपारी पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या काही मैत्रिणीसोबत घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपी अंकुश याठिकाणी आला. त्याने पीडित मुलीला बळजबरीने शाळेच्या परिसरात नेले. त्या ठिकाणी कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर आरोपी पीडितेला शौचालयात घेऊन गेला. आरोपीने त्या ठिकाणी मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली.वेदना असहाय्य झाल्याने पीडितेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यादरम्यान लहान मुलीचा आवाज ऐकून एका युवकाने शाळेच्या शौचालयात धाव घेतली.

यानंतर या युवकाने पीडित मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि आरोपीला पकडून ठेवले. तेवढ्यात आजूबाजूचे लोक तिकडे जमा झाले त्यांनी आरोपी अंकुश भोस्करला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासोबत अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पोलीस स्टेशनच्या आवारात नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली होती.