व्वा! गुडघा टेकून हेलिकॉप्टर शॉट ; राशीद खानची अजब करामत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरु आहे. क्रिकेटच्या या छोट्या स्वरुपात मोठी फटकेबाजी, उत्तुंग चौकार आणि षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळते. या स्पर्धेत आज (21 फेब्रुवारी) पेशावर झालमी विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लाहोरच्या फिरकीपटू राशिद खानने गुडघ्यावर बसत धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट मारत आपल्या टीमला विजय मिळवून दिला आहे. राशिद खानच्या या फटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

सामन्याच्या दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर अमद बट टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर राशिदने गुडघ्यावर बसून जोरदार सिक्स खेचला. यासह लाहोरने 141 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 9 चेंडू राखून पार केलं.

राशिद खानने 15 चेंडूत 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकारासह ताबडतोड नाबाद 27 धावा केल्या. तर मोहम्मद हाफिजनेही सर्वाधिक नाबाद 33 रन्सची खेळी केली. तसेच पेशावरकडून वाहब रियाझ आणि साकिब महमूदने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’