राशिद खानने लगावला अफलातून षटकार; गोलंदाजानेही लावला डोक्याला हात, व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खानने आपल्या गोलंदाजीतून जशी जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक छाप टाकलीआहे तशाच प्रकारे त्यानं आपल्या फलंदाजीच्या क्षमेतेतून भल्याभल्यांना आश्चर्यचकित केलं आहे. असाच काहीसा अचंबित करणारा एक व्हिडिओ राशीदने ट्विटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विचित्र पद्धतीने षटकार मारताना दिसत आहे.

राशिदच्या या व्हिडिओला ट्विटरवर बरीच पसंती मिळत आहेत. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा षटकार पहिल्यांदाच कोणी मारला असेल. या व्हिडिओमध्ये राशिद खान एका स्पर्धेत फलंदाजी करताना दिसत असून त्याने अगदी वेगळ्या शैलीत अफलातून शॉट मारला आहे. राशीद एका वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने क्रिकेटमधील लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉटशी साधर्म्य असलेला शॉट मारताना व्हिडिओत दिसत आहे. राशीदने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही याला हेलिकॉप्टर शॉट म्हणाल का? मला तरी वाटतो… ”

दरम्यान राशिदच्या चाहत्यांनी त्याच्या व्हिडिओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले, “मी याला रिव्हर्स हेलिकॉप्टर शॉट म्हणेन.” तर काहीजण या व्हिडिओला निन्जा शॉट म्हणत आहेत. अलीकडेच राशिद खान बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसला. तो बीबीएलमध्ये अ‍ॅडलेड स्ट्रायकरकडून खेळत आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने हॅटट्रिक घेतली. ज्यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment