Ration Card | केंद्र सरकार हे देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असतात. या योजनेचा लाभ देशातील अनेक लोकांना होत असतो. देशातील प्रत्येक गटाचा विचार करता, विविध योजना राबवल्या जातात. आपल्या समाजातील गरिबी दूर व्हावी आणि लोकांना दोन वेळेचे चांगले अन्न खाता यावे. यासाठी देखील सरकार खूप प्रयत्न करत असतात. आणि या लोकांसाठी सरकार कमी दरात राशन देखील पुरवत असतात. परंतु हे राशन घेण्यासाठी नागरिकांकडे रेशन कार्ड (Ration Card) असणे खूप गरजेचे आहे. रेशन कार्ड असेल तरच सरकारच्या या कमी किमतीच्या राशन योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार. परंतु आता या रेशन कार्डच्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहे आणि आता या रेशन कार्डमध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळणार नाही.
याआधी शासन राशन कार्डवर (Ration Card) अनेक गोष्टी देत होते. परंतु आता इथून पुढे या रेशन कार्डवर मोफत तांदूळ देणे बंद करणार आहे. शिधापत्रिका द्वारे राशन वितरण केंद्रावर मोफत तांदूळ दिला जाणार नाही. सरकारने ही त्यांची एक सुविधा बंद केलेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याद्वारे नागरिकांच्या अन्नातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तांदूळ देणे बंद होणार आहे. आणि त्याऐवजी आता इतर गोष्टीत गोष्टी दिल्या जाणार आहेत. तांदळा ऐवजी सरकार आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि इतर मसाले देखील देणार आहेत.
त्याचप्रमाणे तुम्ही जर रेशन कार्ड (Ration Card) धारक असेल आणि तुम्ही जर कमी किमतीत या योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.अन्यथा तुम्हाला इथून पुढे सरकारच्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या राशन दुकानात जाऊन ही केवायसी करणे खूप गरजेचे आहे. ज्या लोकांनी एक केवायसी केले नाही. त्यांचे नाव या रेशन कार्डमधून टाकणार असल्याची माहिती सरकारने दिलेली आहे. तसेच 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही ईकेवायसी करू शकता. अशी देखील माहिती सरकारकडून दिलेली आहे.