Ration Card Rule | सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा असतात. यातील एक महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. आता याच लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. ती म्हणजे आता इथून पुढे या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशनचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुमच्या रेशन कार्डला, आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे. आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर पर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच तुमच्या आधार कार्ड रेशन कार्डला (Ration Card Rule) लिंक करणे खूप गरजेचे आहे.
केवायसी करणे का गरजेचे आहे | Ration Card Rule
ई केवायसी केल्यामुळे आधार कार्ड आणि रेशन कार्ड एकमेकांना लिंक केले जातात. यामुळे आधार कार्डची पडताळणी करणे देखील सोपे होणार आहे. आणि या योजनेचा गैरफायदा अनेक लोक येतात. ते देखील कमी होणार आहे. ई केवायसीच्या मदतीने एक व्यक्ती एकापेक्षा जास्त ठिकाणी राशनचा लाभ घेऊ शकत नाही. जर ते कुणी घेत असेल, तर पुढे जाते ठीक ई केवायसीमुळे कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तुम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत ई केवायसी पूर्ण केले नाही, तर तुमचे संपूर्ण रेशन कार्ड रद्द होऊ शकते. याचा अर्थ तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही.
केवायसी कशी करावी ?
इ केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या राशन दुकानदाराकडे जावे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सोबत घेऊन जायचे आहे. तिथे तो दुकानदार तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल. यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही. अगदी काही मिनिटातच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जर त्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही ई केवायसी करणे गरजेचे आहे.