नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील T-20 (T20) मालिकेतील (T20) अखेरचा सामना काल पार पडला. हि मालिका भारताने 4-1 अशी जिंकली आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात (T20) इतिहास रचला गेला. T20 च्या आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर याआधी कधीही घडले नाही अशी कामगिरी कालच्या सामन्यात पाहायला मिळाली. भारताच्या फिरकीपटूंनी हा इतिहास रचला आहे. रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल अशी या फिरकीपटूंची नावे आहेत.
काय आहे विक्रम ?
आंतरराष्ट्रीय T20 (T20) मध्ये एका डावात सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेऊन नवा इतिहास रचला आहे. कालच्या सामन्यात रवीने 4, कुलदीप आणि अक्षरने 3 बळी घेतले वेस्ट इंडिजच्या 10 गडी बाद करण्यात रवी बिश्नोई आघाडीवर होता. त्याने एकट्याने 10 पैकी 4 कॅरेबियन फलंदाजांचे बळी घेतले. बिश्नोईशिवाय कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. कुलदीपने 12 धावांत 3 बळी घेतले, तर अक्षरने 15 धावांत 3 बळी घेतले. या मालिकेतील कुलदीप यादवचा हा पहिलाच सामना होता.
All 10 wickets to spinners as India thump West Indies
Watch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) | Scorecard: https://t.co/eGHzeSWxow pic.twitter.com/TPxziGwW3q
— ICC (@ICC) August 7, 2022
श्रेयस-हुडाची जोरदार खेळी
कालच्या सामन्यात (T20) सलामीसाठी आलेला इशान किशन अपयशी ठरला आणि त्याला केवळ 11 धावा करता आल्या. मात्र, अय्यर (64 धावा, 40 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार) आणि दीपक हुडा (38 धावा, 25 चेंडू) यांनी भक्कम भागीदारी केली. या दोघांनी मिळून 76 धावांची भागीदारी करून भारताला 100 धावांच्या पुढे नेले. श्रेयसनं 30 चेंडूत आठवे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. हुडानेही छोटी पण झटपट खेळी खेळली. मात्र, लागोपाठच्या षटकांत दोघेही पॅव्हेलियनमध्ये परतले.कर्णधार हार्दिक पंड्याने (28 धावा, 16 चेंडू) काही मोठे फटके मारून भारतीय डावाचा वेग कमी होऊ दिला नाही. अखेरीस भारताला जलद फिनिशिंग टच मिळाला नसला तरी संघाने 188 पर्यंत मजल मारली.
यानंतर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं (T20) जेसन होल्डरला डावाची सलामी देत सर्वांनाच चकित केले. हार्दिकनं डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याच्यासोबत गोलंदाजीची सुरुवात केली आणि ती यशस्वी ठरली. होल्डर अवघ्या तीन चेंडूंत खाते न उघडता बाद झाला. अक्षरनं पॉवरप्लेच्या पाचव्या षटकापर्यंत तीन बळी घेत विंडीजचा डाव खिळखिळा केला. यानंतर 16 व्या षटकात संपूर्ण संघ अवघ्या 100 धावांत गारद झाला.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!