हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजकारणात प्रवेश केला आहे. जडेजा आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जडेजाची पत्नी जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. आता जडेजा सुद्धा भाजपचा सदस्य झाल्याने दोघेही भाजपसाठी काम करताना पाहायला मिळू शकतात. जडेजाने अलीकडेच t20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
रिवाबाने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जडेजाच्या (Ravindra Jadeja) भाजप प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. त्याचा फोटो सुद्धा तिने ट्विट केला आहे. रवींद्र जडेजा अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. दोघांनी मिळून गुजरात मध्ये अनेक रोड शो देखील केले आहेत. आता जडेजा भाजपाच सदस्य झाल्याने पक्षासाठी दोघेंही आणखी वेळ देतील असं वाटतंय. तसेच जडेजाची एकूण लोकप्रियता बघता गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी जडेजा फक्त भाजपचा सदस्य झाला आहे, आता आगामी काळात त्याच्यावर पक्षाकडून कोणती नवीन जबाबदारी सोपवण्यात येतेय का ते सुद्धा पाहायला हवं.
🪷 #SadasyataAbhiyaan2024 pic.twitter.com/he0QhsimNK
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) September 2, 2024
कशी आहे जडेजाची कारकीर्द– Ravindra Jadeja
रवींद्र जडेजा हा भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी आणि लेफ्ट आर्म फिरकी गोलंदाजी करणारा जडेजा मागील १५ वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली आहे. जडेजाने भारतासाठी आत्तापर्यंत ७२ कसोटी, १९७ वनडे आणि ७४ t20 सामने खेळले आहेत. याशिवाय २४० आयपीएल सामन्यात सुद्धा त्याने प्रतिनिधित्व केलं आहे. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो आपल्याला राजकीय आखाड्यात दिसू शकेल.