रवींद्र जडेजाला डबल धक्का ! पहिले कर्णधारपद गेले, आता थेट आयपीएलमधून बाहेर

Ravindra Jadeja
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सिझन निराशाजनक गेला आहे. एकीकडे टीमला पराभवाचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे टीमच्या खेळाडूंना दुखापत होत आहे. दीपक चहरमुळे तो संपूर्ण आयपीएल खेळू शकला नाही त्यानंतर आता रवींद्र जडेजासुद्धा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे उरलेली आयपीएल खेळू शकणार नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना जडेजाच्या (Ravindra Jadeja) हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे जडेजा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये खेळला नव्हता.

यंदाची आयपीएल सुरू व्हायच्या आधी एमएस धोनीने टीमचं नेतृत्व सोडले होते, यानंतर जडेजाला कॅप्टन्सी देण्यात आली, पण सीएसकेच्या खराब कामगिरीमुळे जडेजानेही कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा धोनीकडे टीमचं नेतृत्व देण्यात आले. धोनीच्या नेतृत्वात टीमने मागच्या 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल 2022 मध्ये अजून 3 मॅच शिल्लक आहेत. जर त्यांना प्ले-ऑफचं आव्हान कायम ठेवायचे असेल तर त्यांना या तिन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तसेच आरसीबी आणि राजस्थान त्यांच्या उरलेल्या सगळ्या मॅच हरतील, अशी प्रार्थनाही सीएसकेला करावी लागणार आहे. मागच्या काही दिवसांपासून जडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवलं जात आहे, पण त्याच्यामध्ये काहीच सुधारणा झालेली नाही. सीएसकेचे प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे सीएसके फार मोठा धोका पत्करणार नाही.

जडेजासाठी (Ravindra Jadeja) यंदाचा आयपीएल सीझन निराशाजनक राहिला आहे. त्याने 10 सामन्यात फक्त 5 विकेट घेतल्या आणि 116 रन केले आहेत. आयपीएल सुरू व्हायच्या 2 दिवस आधी जडेजाला चेन्नईचं कर्णधार करण्यात आलं होतं, पण जडेजाच्या नेतृत्वात चेन्नईचा लागोपाठ 4 सामन्यांमध्ये पराभव झाला. त्यामुळे त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर त्याने दबावामध्ये कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला.

हे पण वाचा :

Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा

जयकुमार गोरे यांना दणका; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन अर्ज

एका महिला खासदाराला तुरुंगात टाकणे याला मर्दपणा म्हणत नाही…; रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

आता डेबिट-क्रेडिट कार्डशिवाय काढता येणार कॅश, संपूर्ण प्रक्रिया पहा

Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!