रवींद्र जाडेजाचे अफलातून क्षेत्ररक्षण ; व्हिडिओ झाला वायरल

Ravindra Jadeja
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील रोमांचक सामन्यात चेन्नईचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने जबरदस्त फिल्डींग करत सुनील नारायण ला माघारी पाठवले. जाडेजाचा हा फिल्डींगचा नजराणा बघून सर्वच हैराण झाले. कर्ण शर्माच्या बॉलवर नारायणने लॉ़ग ऑनवर जोरदार शॉट मारला. बॉल सीमारेषेवर पडण्याआधी जडेजाने डाय मारत कॅच पकडला. पण बाँड्री लाईनला टच होण्याआधीच त्याने बॉल फाफ डु प्लेसीकडे टाकला. त्याने देखील बॉल पकडला आणि नरेनला बाहेर जावं लागलं.

जडेजाचा हा कॅच आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनी देखील जडेजाची फिल्डिंग पाहून हैराण झाला.

रविंद्र जडेजा हा देशातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असून त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 65 कॅच पकडले आहेत. मैदानावर उत्कृष्ठ फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये जडेजा मोजला जातो. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कॅच पकडण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 102 कॅच पकडले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’