RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???

RBI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे देशातील आणखी एक सहकारी बँक आता बंद केली जाणार आहे. यावेळी पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे कामकाज पुढील आठवड्यापासून बंद केले जाणार आहे. जर आपलेही या बँकेत खाते असेल तर लवकरात लवकर आपले डिपॉझिट्स काढून घ्या. RBI कडून ऑगस्टमध्येच पुण्यातील रुपे सहकारी बँक लिमिटेडचा लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या बँकेची बँकिंग सर्व्हिस देखील 22 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.

Rupee Cooperative Bank: RBI cancels licence, lakhs of depositors in jeopardy

लायसन्स का रद्द केले ???

RBI च्या म्हणण्यानुसार, 22 सप्टेंबर रोजी बँकेकडून आपले कामकाज बंद केले जाईल. यानंतर ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने बँकिंग लायसन्स रद्द करण्यात आले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार, रुपी सहकारी बँक लिमिटेडची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. तसेच बँकेकडे कोणतेही भांडवल देखील शिल्लक नव्हते. यामुळे RBI कडून त्यांचे बँकिंग लायसन्स रद्द केले गेले आहे.

Rupee Cooperative Bank has earned profit of Rs 11.87 crore

ग्राहकांच्या पैशांचे पुढे काय होणार???

हे जाणून घ्या कि, ज्या ग्राहकांचे रुपी सहकारी बँक लिमिटेडमध्ये पैसे जमा आहेत त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर इन्शुरन्स कव्हर मिळेल. हे इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून मिळणार आहे. DICGC ही देखील रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी आहे. हे सहकारी बँकेच्या ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देते. यामुळे आता ज्यां ग्राहकांची पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम या बँकेत जमा असेल तर त्यांना DICGC कडून पूर्ण क्लेम मिळेल. मात्र ज्या ग्राहकांचे डिपॉझिट्स 5 लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांना पूर्ण रक्कम मिळणार नाही. हे लक्षात घ्या कि, DICGC कडून फक्त 5 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेची भरपाई दिली जाईल.

PM Modi launches 2 RBI schemes. All about the central bank initiatives - Hindustan Times

गेल्या महिन्यात करण्यात आली घोषणा 

RBI ने10 ऑगस्ट रोजीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली होती. ज्यामध्ये सहा आठवड्यांनंतर रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग लायसन्स रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद केल्या जातील. तसेच ग्राहकांना त्यांचे पैसे देखील काढता येणार नाहीत. आता 22 सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज ठप्प राहणार आहे.

हे लक्षात घ्या कि, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी देशातील बँकांकडून दंड आकारत असते. यादरम्यान काही बँकांचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले आहेत. अशातच रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेकडून त्यांचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rupeebank.com/

हे पण वाचा :

Indian Bank ने सुरु केली स्पेशल FD योजना, नवीन व्याज दर पहा !!!

Multibagger Stock : पतंजली फूड्सच्या शेअर्सने गेल्या 3 वर्षात दिला 39,000% रिटर्न !!!

Gold Price Today : सोने घसरले तर चांदीमध्ये झाली वाढ, आजचे नवीन दर पहा

FD Rates : खाजगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने FD वरील व्याजदरात केली पुन्हा वाढ, नवीन दर तपासा

Sovereign Gold Bond वर किती टॅक्स द्यावा लागतो तज्ञांकडून समजून घ्या !!!