RBIचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल आणि केंद्रामध्ये पॅचअप; सरकारने ‘या’ संस्थेच्या अध्यक्षपदी केली निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा पुढे करत मुदतीपूर्वीच गव्हर्नरपदाचा राजीनामा देणारे डॉ. उर्जित पटेल अवघ्या दीड वर्षात कमबॅक करण्यात सज्ज झाले आहेत. पटेल यांची नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अर्थ मंत्रालय, नीती आयोग आणि राज्य सरकार यांच्याशी समन्वय साधण्यासाठी NIPFP ची निंर्मिती करण्यात आली आहे.

तत्पूर्वी डॉ. पटेल यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं. पटेल यांच्या गव्हर्नरपदाच्या काळात केंद्र सरकारचा रिझर्व्ह बँकेत अवाजवी हस्तक्षेप वाढला होता. यामुळे बँकेची स्वायत्तता धोक्यात आली होती. त्यामुळं पटेल यांनी वैयक्तिक कारण देत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डिसेंबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. बुडीत कर्जाच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांवर निर्बंध लादल्यानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील संबंध ताणले गेले. पटेल यांनी अनेकदा यावर जाहीर भाष्य करणे टाळले. मात्र काम करणे अवघड झाल्याने अखेर त्यांनी तब्बेतीचे कारण पुढे करत पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१८ मध्ये पटेल यांनी राजीनामा दिला. त्यांचा नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता.

दरम्यान, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पटेल यांची नव्या ठिकाणी नियुक्ती होणे अशक्य आहे. त्यामुळे पटेल आणि केंद्र सरकारमध्ये आता पॅचअप झाल्याचे म्हणता येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) या संस्थेवर मुख्यत्वेकरून अर्थ खात्याचे नियंत्रण आहे. त्यामुळे अर्थ खात्यासोबत पटेल यांना काम करावं लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”