जम्मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात चकमक 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर च्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्या मध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. दहशतवाद्यांची संख्या २ ते ३ आहेत आणि ते सातत्याने फायरिंग करत आहेत. सुरक्षादल देखील उत्तरादाखल कारवाई केली जात आहे. इथे सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीर मधील लकड़पोरा परिसरात सुरक्षा दला सोबत शनिवारी दहशवाद्यांची चकमक झाली.

सुरक्षा दलाला विश्वसनीय सूत्रांकडून या परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. लकड़पोरा ला लकीरपुर नावाने देखील ओळखले जाते. के नाम से भी जाता है. हा परिसर शोपियां आणि  कुलगाम बॉर्डर जवळ येतो. २ ते ३ असे दहशतवादी इथे लपून बसले आहेत. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असल्याचे सांगितले जाते आहे. जम्मू कश्मीर च्या डीजीपीनी सांगितले की विश्वसनीय इनपुट वरून  कुलगाम पोलिसांनी सैन्यासोबत लकड़पोरा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले.

दहशतवादी आणि सुरक्षादलात सर्च ऑपरेशन मध्ये बरेच राउंड फायरिंग होते आहे. या घटनेच्या संदर्भात अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. एकीकडे चीन तर दुसरीकडे पाकिस्तान असे दोन्ही बाजूने सीमेवर तणावाचे वातावरण दिसून येते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment