नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी कर्जदाता असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक यासह अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना बिटकॉइन आणि डॉजकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग न करण्याबाबत ई-मेल पाठवून दूर रहाण्याचा इशारा दिला आहे. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे बँक कार्ड्स देखील रद्द केली जाऊ शकतात असे देखील सांगण्यात आले आहे. यावर रिझर्व्ह बँकेने परिस्थिती स्पष्ट करून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा दिला आहे. या चेतावणीसाठी बँका ज्या परिपत्रकाचा संदर्भ देत आहेत, ते परिपत्रक सुप्रीम कोर्टाने फेटाळले असल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
SC ने 2020 मध्ये RBI च्या 2018 चे परिपत्रक चुकीचे ठरवले
रिझर्व्ह बँक म्हणाली,” माध्यमांच्या अहवालातून हे कळले आहे की, अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना क्रिप्टो करन्सीच्या खरेदी आणि विक्रीपासून दूर रहाण्याचा इशारा देणारा ईमेल पाठविला आहे. हा इशारा पाळला गेला नाही तर त्यांची कार्डे रद्द केली जाऊ शकतात असेही यात म्हटले गेले आहे. यासाठी 6 एप्रिल 2018 रोजी RBI च्या परिपत्रकाचा उल्लेख केला जात आहे.” RBI ने सांगितले की,”सर्वोच्च न्यायालयाने केवळ 4 मार्च 2020 रोजी हे परिपत्रक फेटाळून लावले. म्हणून, आता या परिपत्रकास कोणतीही वैधता नाही. या व्यतिरिक्त बँका आपल्या ग्राहकांना डिजिटल करन्सीमध्ये व्यवहार न करण्याचा इशारा देऊ शकत नाहीत.”
बँकांनी KYC चे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली
RBI ने बँक आणि इतर संस्थांना KYC नियम, मनी लाँडरिंग आणि इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी RBI च्या 2018 च्या परिपत्रकाचा हवाला देत ग्राहकांना डिजिटल करन्सीमधून व्यवहार करण्यापासून दूर राहण्याची सूचना केली आहे. तसेच, काही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजची सर्व्हिस देखील नाकारली गेली आहे. देशातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, WazirX ला महिन्याभरात बँकिंगच्या पार्टनर्ससह कस्टमर फंड्स डिपॉझिट करण्यात आणि काढण्यात अडचणी आल्या. यापूर्वी, कित्येक अहवालात असे म्हटले गेले आहे की,”एचडीएफसी बँक, स्टेट बँकेसह अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना क्रिप्टोकरन्सी व्यवहार करण्यासाठी खाती निलंबित करण्याचा इशारा दिला.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group