हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचा (MPC) निकाल बुधवारी सकाळी बाहेर आला आहे. यावेळी गव्हर्नर दास यांनी सांगितले की,” सध्याचा महागाईचा दबाव पाहता पुन्हा एकदा रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.” RBI च्या या निर्णयामुळे आता होम, कार आणि पर्सनल लोन महागणार आहेत.
इथे हे लक्षात घ्या कि, RBI कडून आज रेपो दरात सलग पाचव्यांदा वाढ करण्यात आली आहे. या वर्षी पहिल्यांदा मे महिन्यात रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीपूर्वी प्रभावी रेपो दर 5.90 टक्के होता. जो आता 6.25 टक्क्यांवर आला आहे. रेपो दर हा तो दर असतो त्याआधारे रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना कर्ज दिले जाते. या दरवाढीमुळे आता बँकांना RBI कडून कर्ज घेणे महागणार आहे, त्यामुळे हा भार आता बँकाकडून सर्वसामान्यांवर टाकला जाईल.
कोरोना काळात रेपो दर केला कमी
या आधी देखील कोरोना काळात कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात मोठी कपात करण्यात आली होती. यानंतर रेपो दर सुमारे 2.50 टक्क्यांनी कमी करून 4 टक्के करण्यात आला. मात्र आता कोरोनानंतर महागाईच्या दबावाचे कारण देत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. हे लक्षात घ्या कि, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.4 टक्क्यांवर पोहोचला होता, जो ऑक्टोबरमध्ये 6.7 टक्क्यांवर आला आहे. हेच कारण आहे की, यावेळीही आरबीआयकडून रेपो दरात आधीपेक्षा कमी वाढ केली आहे.
6 पैकी 4 जणांनी रेपो दर वाढविण्याच्या बाजूने केले मतदान
इथे हे लक्षात घ्या कि, MPC च्या या बैठकीत सहभागी झालेल्या 6 सदस्यांपैकी 4 सदस्यांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. यावेळी महागाई आटोक्यात येईपर्यंत व्याजदर वाढवणे आवश्यक आहे, असे त्यांचे मत होते. MPC चे प्रमुख लक्ष्य महागाई कमी करणे हे आहे आणि त्याचा पुढील आढावा घेतला जाईल. यामुळे आता पुढील 12 महिन्यांत किरकोळ महागाईचा दर 4 टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज आहे.
विकास दरवाढीचा अंदाजही कमी
सध्याची वाढती महागाई आणि खपातील घट यामुळे रिझर्व्ह बँकेला विकास दराचा अंदाजही कमी करावा लागला आहे. RBI कडून चालू आर्थिक वर्षासाठी 7 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जो आता 6.8 टक्क्यांवर आणला आहे. नुकतेच जाहीर झालेले दुसऱ्या तिमाहीतील वाढीचे आकडेही मंदावले आहेत. दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.3 टक्के होता, जो पहिल्या तिमाहीत 13 टक्क्यांवरून वाढला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/Annualpolicy.aspx
हे पण वाचा :
Business Idea : भरपूर मागणी असलेला ‘हा’ व्यवसाय सुरू करून मिळवा मोठा नफा
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा येऊ शकेल अडचण
Yes Bank च्या FD वरील व्याजदरात बदल, असे असतील नवीन दर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात उसळी, आजचे नवीन दर तपासा
Axis Bank देखील FD वर देणार जास्त व्याज, जाणून घ्या नवीन व्याजदर